
पुणे ( प्रतिनिधी ) निःशुल्क २६ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन-*नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय भोसरी पुणे ३९ तर्फे दरवर्षी कवींच्या काव्य लेखणीला धार मिळण्यासाठी *राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली जाते. कवींना निसर्ग स्वस्थ बसू देत नाही. श्रावण व निसर्ग* या विषयांवर कवींनी दोन कविता पाठवाव्या.निःशुल्क ही स्पर्धा व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्य *लेखन स्पर्धेतून निवडलेल्या कवितांना व विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र, शाल,गुलाब पुष्प ,श्रीफळ देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येते.*दरवर्षी या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. *सलग या स्पर्धेचे २६ वे वर्ष आहे.* प्रत्येक सहभागींना सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात येत असते. सहभागींची श्रावणी काव्य मैफल सुद्धा संपन्न होत असते.*कवींनी आपल्या कविता २५ ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत खालील पत्त्यावर फक्त पोस्टाने पाठवाव्या.*कवींनी आपला पूर्ण पत्ता, मोबाईल व पिन कोड सह कविता पाठवाव्या. *कविता पाठवण्याचा पत्ता-**प्रा राजेंद्र दशरथ सोनवणे* *राष्ट्रीय अध्यक्ष -नक्षत्राचं देणं काव्यमंच, साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाइट्स, पीसीएमटी चौक, भोसरी पुणे-४११०३९. वर पाठवणे अपेक्षित आहे.* संस्थेने आत्तापर्यंत आठ अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन, दीडशे प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशन, हजारो काव्य मैफल, शेकडो काव्य बैठका, शेकडो कार्यशाळा, कवींचे कॅलेंडर व काव्य सहलीचे आयोजन केले आहे. काव्यमंचाच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा कार्यरत आहे. असे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा राजेंद्र सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
