
निफाड (प्रतिनिधी ) १३ जुलै आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आणि माहितीच्या युगात नवकल्पना आणि वेगळं पण सिद्ध करणारे संशोधन हे वैज्ञानिक भारताच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचे मुख्य स्त्रोत आहे . नवकल्पनांची आणि संशोधनाची योग्यरीत्या नोंद व संरक्षण करण्यासाठी बौद्धिक संपदा अधिकार आवश्यक असल्याचे मत डॉ. प्रशांत कोळी यांनी व्यक्त केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार या विषयावर शनिवार दि.१२ जुलै रोजी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे,प्रा डॉ विक्रम जाधव, प्रा भगवान कडलग प्रा मोहाड,प्रा डॉ सुसान लॉरेन्सिया प्रा योगेश कडलग प्रा आर एस मोहोड प्रा भाऊराव मुंतोंडे आदी उपस्थित होते प्रा डॉ प्रशांत कोळी पुढे म्हणाले की, औद्योगिक क्रांतीनंतर संशोधनाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे परंतु नवकल्पनांच्या साह्याने निर्माण केलेल्या कलाकृती, संशोधन , डिझाईन, सॉफ्टवेअर इत्यादीचे संरक्षण करण्याची गरज भासू लागली म्हणून बौद्धिक संपदा अधिकार निर्माण त्यामुळे पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क आदीमुळे संशोधनाचे संरक्षण झाले. यासाठी संशोधकांनी आपल्या नवकल्पनांची नोंदणी बौद्धिक संपदा अधिकार कायद्या अंतर्गत करणे आवश्यक आहे . असे प्रतिपादन केले या कार्यशाळेत डॉ. विक्रम जाधव प्रा. भगवान कडलग यांनी देखील मार्गदर्शन केले. डॉ.विक्रम जाधव यांनी बौद्धिक संपदा अधिकाराचे महत्त्व विशद केले .प्रा. भगवान कडलग यांनी देशातील अनेक विद्यापीठे आता बौद्धिक संपदा अधिकार या विषयक अभ्यासक्रम तयार करीत आहे हा अभ्यासक्रम नव संशोधकांना प्रोत्साहन ठरवू पाहत आहे. याविषयीची माहिती दिली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी ग्रामीण भागातील संशोधकांमध्ये संशोधनाचा खजिना आहे ,त्यांच्या संशोधन कृतीला योग्य चालना दिल्यास दर्जेदार संशोधन निर्माण होईल.बौद्धिक संपदा सर्जनशीलता आणि नावीन्यतेला प्रोत्साहन देते. त्यामुळे संशोधक, कलाकार, उद्योजक आणि तंत्रज्ञ आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणून समाजाला काहीतरी नवे देऊ शकतात. विद्यार्थ्यांनी आणि नव संशोधकांनी आपल्या नवकल्पना मर्यादित न ठेवता त्याची नोंदणी करून आपल्या नवकल्पनांना संरक्षण करून देण्याची गरज प्राचार्यांनी विशद केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती आर.एस. मोहोड यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती चैताली कापसे यांनी केले.फोटो ओळ निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकार कायदा कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा डॉ प्रशांत कोळी,व्यासपीठावर प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे,प्रा भगवान कडलग, प्रा डॉ विक्रम जाधव, प्रा डॉ सुसान लॉरेन्सिया प्रा योगेश कडलग प्रा आर एस मोहोड आदी.
