
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६६ वा दिवस
आपण केलेला प्रत्येक विचार, केलेली प्रत्येक क्रिया काही कालाने सूक्ष्म रूप धारण करते, जणू बीजरूप धारण करते आणि अव्यक्त रूपाने या सूक्ष्म शरीरात राहते. कालांतराने फिरून प्रकट होऊन अनुरूप फल देते. या फलांनी माणसाचे जीवन नियंत्रित होत असते. याप्रमाणे माणूस स्वतःच्या कर्मानेच स्वतःचे जीवन घडवीत असतो माणूस आणखी कोणत्याही नियमांच्या अधीन नाही, केवळ स्वतःच्याच कर्मबंधनांनी तो बांधला गेलेला आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २२ आषाढ शके १९४७
★ आषाढ वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १४ जुलै २०२५
★ संकष्ट चतुर्थी 🌸
★ १८५६ दैनिक केसरी व सुधारकचे संपादक, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिन.
★ १९२० महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिन.
