
सोनांबे ( प्रतिनिधी )विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालक यांची भूमिका महत्वाची असून या दोन घटकातील समन्वय विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देतो त्यामुळे शिक्षक पालक संघ महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य बी एम पवार सर यांनी केले.ते सोनांबे विद्यालयात आयोजित शिक्षक पालक व माता पालक मेळाव्यात बोलत होते अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार होते.

विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे,पर्यवेक्षक दिगंबर जाधव,पालक संघाचे मावळते उपाध्यक्ष नितीन पवार,शालेय समिती सदस्य निवृत्ती बोडके,विष्णू पवार,रावसाहेब पवार,बापू डावरे,संजय डावरे, कचरू पाटील पवार ,ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे आदी मंचावर उपस्थित होते.तालुका संचालक आदरणीय कृष्णाजी भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती व छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

विद्यालयाच्या गीत मंचाने ईश स्तवन व स्वागतगीत सादर केले.पालक संघाचे सचिव ज्येष्ठ शिक्षक सोपान पवार यांनी प्रास्ताविक केले. योगिता शिंदे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा व उपक्रमांचा आढावा घेतला.मविप्र सांस्कृतिक महोत्सवात विद्यालयाने जिल्ह्यात प्रथम तसेच मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.नवीन शैक्षणिक वर्षासाठी माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी प्रियांका रत्नाकर तर शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षपदी प्रवीण पवार यांची निवड करण्यात आली.माता पालक संघाच्या सदस्यपदी सौ ललिता दीपक डगळे ,सौ सरिता नितीन गुरव, सौ वर्षा हरी शिंदे ,सौ वैशाली उत्तम शिंदे , सौ अनिता विजय भडांगे, सौ सुवर्णा सचिन शिंदे ,सौ मीनाक्षी ज्ञानेश्वर भागवत ,सौ कविता शंकर पवार ,सौ पूजा प्रवीण शिंदे सौ रत्ना मारुती वारुंगसे यांची तर सचिवपदी ज्योती पाटील यांची निवड करण्यात आली.पालक शिक्षक संघाच्या सचिवपदी सोपान पवार ,सह सचिव पदी दिनकर जोंधळे यांची तर सदस्य म्हणून सर्वश्री ज्ञानेश्वर सदगीर,मोहन शिंदे,सरिता गुरव,विकास कोटकर,रामदास शिंदे,निलेश शिंदे,बापू डावरे,सचिन शिंदे,अरुण मुंढे,संदीप बोडके,संजय डावरे,नवनाथ शेळके,भाऊराव माळी, सुवर्णा शिंदे,नसरीन शेख,उमेश डावरे आदींची निवड करण्यात आली.दोन्ही संघाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांची निवड करण्यात आली

.नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार यावेळी करण्यात आला.मेळाव्याचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी केले तर पर्यवेक्षक दिगंबर जाधव यांनी आभार मानले.अध्यक्ष नंदू पाटील पवार तसेच मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले.गुरुवर्य बी एम पवार यांनी स्वतः प्रकाशित केलेली पुस्तके शालेय ग्रंथालयासाठी भेट दिली.मेळाव्याला सो,सोनारी, हरसुले, कोनांबे,वडगाव,खाप राळे, धोंडबार, औंढे वाडी येथील पालक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
