
नांदगाव (प्रतिनिधी). विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे सतीश परदेशी यांचा सत्कार नांदगाव येथील हनुमान मंदिर येथे विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल चे सर्व पदाधिकारी तसेच गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनमाड येथील पत्रकार समाजसेवक गोरक्षक सतीश भाऊ परदेशी यांची महाराष्ट्र शासन मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत समितीच्या वतीने मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल नांदगाव मालेगाव तालुक्यातील सर्व गौ रक्षकांकडून मोठ्या उत्साहात घोषणा देत सतीश भाऊ परदेशी यांचा पुष्प गुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित दत्तराज जी छाजेड विकासजी शर्मा राहुल भाऊ पैठणकर सिद्धेश भावसार प्रीतम पवार सौरभ वर्देकर मयूर कुलकर्णी अक्षय पवार प्रेमराज पाटील डॉ गौरव बोरसे हर्षल जगताप अतुल जोशी तसेच गोरक्षक उपस्थित होते
