
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६५ वा दिवस अंतःप्रेरणेनेनुसार कार्य केले पाहिजे. ते जर कार्य योग्य, उत्तम, आवश्यक असेल तर समाज ते डोक्यावर उचलून घेईलच. कदाचित काम करणाऱ्याला हे यश आपल्या जीवंतपणी पाहायला मिळणार देखील नाही. पण आपण स्वतःला तन-मन-धनपूर्वक कार्यात पूर्णपणे झोकून दिले पाहिजे. ज्यांना जगाचे हित करावयाचे आहे त्यांनी आपली सुख-दुःखे, यश, कीर्ती हे सारे ‘समुद्रास्मृप्यन्तु’ केले पाहिजे. केवळ एका ध्येयासाठी आपण सर्वस्व समर्पणाला सिद्ध झालो नाही, तर दिव्यत्वाचे दर्शन आपल्याला कधीच होणार नाही. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २१ आषाढ शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १३ जुलै २०२५
★ १६६० वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा बलिदान दिन (तिथीनुसार आषाढ शुद्ध पौर्णिमा ‘गुरुपौर्णिमा) त्यांनी महाराज विशाळगडावर पोहचेपर्यंत गजापूरच्या घोडखिंडीच्या (पावनखिंड) लढाईत ३०० मावळ्यांसह सिध्दीच्या १० हजार सैन्याला रोखून ठेवले होते.
★ १६६० छत्रपती शिवाजी महाराजांवर पर्यायाने हिंदवी स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी वीर शिवा काशिदचे बलिदान (स्मृतीदिन)
★ २००० साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचा स्मृतीदिन
★ २००९ सुप्रसिध्द अभिनेते निळू फुले यांचा स्मृतीदिन.
