
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६४ वा दिवस व्यापारी मलाप्रमाणेच विचार देखील कुणीतरी निर्माण केलेल्या मार्गानेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. एका ठिकाणाहून दुसरीकडे विचारांचे संक्रमण होण्यापूर्वी प्रशस्त अशा मार्गाची सिद्धता ही असावीच लागते. जेव्हा जेव्हा जगाच्या इतिहासात एखादे विश्वविजयी राष्ट्र उदयास येते व जगातील भिन्न विभागांना एकत्र जोडते. तेव्हा, निर्माण झालेल्या या मार्गांनी भारतातील विचारांचा प्रवाह, प्रवाहीत होऊन वाहू लागतो. आणि सर्व मानव वंशाच्या नसानसातून तो प्रविष्ट होतो.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २० आषाढ शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १२ जुलै २०२५ ★ ख्रिस्त पूर्व १०० रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्मदिन
★ १८६४ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्मदिन.
★ १९८२ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) नाबार्ड ची स्थापना झाली.
★ २००० थोर कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतीदिन
★ जागतिक कागदी पिशव्या दिन
