
नांदगाव (प्रतिनिधी )नांदगाव तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा येथे गुरुपौर्णिमा निमित्त नांदगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला,, त्यावेळेस भदाणे साहेबांनी दिला एक खास संदेश…!पोलीस निरीक्षक दिगंबर हरी भदाणे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…..गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या (आदर्श प्राथमिक शाळेत) नांदगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर हरी भदाणे साहेब आले होते.


त्यांच्या स्वागतासाठी खास सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यांनीही आमच्या सर्व शिक्षकांचा मनापासून गौरव केला आणि त्यातून एक खास संदेश दिला – “गुरूंचे ऋण फेडण्यासाठी माझा हा एक नम्र प्रयत्न आहे.” .दिगंबर हरी भदाणे साहेब आले होते. त्यांच्या स्वागतासाठी खास सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यांनीही आमच्या सर्व शिक्षकांचा मनापासून गौरव केला आणि त्यातून एक खास संदेश दिला – “गुरूंचे ऋण फेडण्यासाठी माझा हा एक नम्र प्रयत्न आहे.”त्यावेळी त्यांनी आपल्या बालपणीचा एक प्रसंग सांगितला – जो आजही त्यांच्या मनात जिवंत आहे…एक लहान मुलगा… सहा वर्षांचा…त्यांच्या घराची परिस्थिती साधी होती. त्यांची आई दररोज त्यांच्या दोन बहिणींना शाळेत पाठवण्यासाठी त्यांच्या डब्यात दोन भाकरी बांधून देत असे. पण भदाणे साहेबांना मात्र अर्धीच भाकरी मिळे – त्यामुळे ते शाळेत जाण्यास नकार देत असत.एका दिवसाची गोष्ट – त्यांनी आईकडे हट्ट केला, “मलाही दोन भाकऱ्या हव्यात!”आई म्हणाली, “तू शाळेत जात नाहीस ना, मग तुला अर्धीच भाकरी.”तेवढ्यात त्यांच्या घरासमोरून त्यांचे श्री कासार गुरुजी आले. साधा धोतर घातलेला, हातात काठी – असा त्यांचा खडतर पण प्रेमळ वेश. आईने लगेच गुरुजींना सांगितले, “हा शाळेत जात नाही, आणि भाकरीसाठी हट्ट करतो.”गुरुजी काहीच न बोलता थेट त्यांच्या मागे धावले!श्री दिगंबर हरी भदाणे साहेब शाळेच्या दिशेने न जाता विरुद्ध दिशेने चिखलात पळाले!पण गुरुजींनी धोतर वर करून त्यांना पकडलं आणि म्हणाले –”तुला भाकरी कमी पडते का? मग माझी घे, पण शाळेत चल!”आणि तू कसा शिकत नाही ते मी बघतोस असे वाक्य बोलले…त्या दिवशी त्यांनी केवळ शाळेचा रस्ता धरला नाही, तर शिक्षणाच्या वाटेने आयुष्य घडवण्याची सुरुवात केली…!
