
*नाशिक : (.प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षणसंस्था महामंडळाच्या नाशिक (शहर) जिल्हाध्यक्षपदी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षणसंस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या वतीने मा.श्री.बाळासाहेब अप्पा क्षीरसागर यांच्यासह मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी केंद्रीयमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उपाध्यक्ष उदय घुगे, सरचिटणीस हेमंत धात्रक, प्राचार्य संजय सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

