
मुंबई (प्रतिनिधी), . ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या समग्र कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन रविवार दि. १३ जुलै रोजी दादर मुंबई येथे सावरकर भवनात होणाऱ्या एका समारंभात करण्यात येईल. चपराक प्रकाशनने स्वरचंद्रिका हा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथात दोनशेहून अधिक लोकांनी फेणाणी यांच्यावर लेखन केले आहे, अशी माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी केले आहे. या ग्रंथाचे संपादन डॉ. संगीता गोडबोल व आश्लेषा महाजन यांनी केले आहे. पद्मजा फेणाणी यांचा या निमित्त सत्कारही करण्यात येणार आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होईल. प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकरस माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. पद्मजा फेणाणी –जोगळेकर यांची प्रकट मुलाखत व संगीतमय मैफलही यावेळी होणार आहे. या गौरवग्रंथात बिस्मिला खान, पं. भीमसेन जोशी, गंगुबाई हनगल, वसंतराव देशपांडे, पु. ल. देशपांडे, मन्ना डे, गझलसम्राट सुरेश भट, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. शिवकुमार शर्मा, बाबा आमटे, फा. फ्रान्सिस दिब्रेटो, बाबासाहेब पुरंदरे, कवी ग्रेस, दुर्गाबाई भागवत, शंकर रामाणी, जॉर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी, पु. ल. देशपांडे, सोनिया गांधी, सुनील दत्त आदींचे लेख व पत्रे या ग्रंथात आहेत. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, सुरेश प्रभू आदींचे तसेच दया मित्रगोत्री, चित्रा क्षीरसागर, शांता लागू यांचेही लेखन या ग्रंथात आहे. एकूण २१६ जणांनी या ग्रंथासाठी लेखन केले आहे. अशी माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.
