
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )आई आणि वडील हे आपले प्रथम गुरू असतात. त्यानंतर पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन जगण्याची शिकवण देणाऱ्या गुरुजनांचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण असते. म्हणूनच ज्ञान आणि संस्कार यांचे विद्यापीठ म्हणजे गुरुजन आहेत, असे उदगार नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांनी काढले. पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण पगार होते. विद्यार्थ्यांनी विविध गीतांच्या सादरीकरणातून गुरूंचे महत्त्व आणि काही विद्यार्थ्यांनी भाषणांतून गुरूंच्या आदर्श आणि संस्कारांची महती सांगितली. गेल्यावर्षी पाचवी ते नववीच्या सर्व तुकड्यांमधून प्रथम आलेल्या हर्षल उगले, दूर्वा उगले, साहिल गोरे, सृष्टी आडके, कार्तिक मोरे, धन्वंतरी गायधनी, साई कोळी, स्वाती कलमे, श्रीरंग मुंजे, समीक्षा शिरोळे, विवेक गायधनी, खुशी सानप, साई चौधरी, मानसी आडके, चंदन राठोड, गौरी चौधरी, ओम रोकडे, मानसी टिळे, सार्थक घुगे, वैष्णवी सानप या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांचाही ग्रंथभेट देत सन्मान करण्यात आला. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या ‘अंतर्गत हिशेब तपासणीस’पदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक अरुण पगार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले. फोटोओळी:- गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यालयातील गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी गुणवंतांसह नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी.
