
मनमाड (प्रतिनिधी)नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडीयम येथे महर्षी व्यास यांची जयंती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात आली यावेळी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन माता पालक समिती मेंबर सौ.पुजा जाधव, काजीकर,शाळेचे मुख्याध्यापिका धात्रक मॅडम, श्री. वाघ सर,पालक यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचा यानिमित्ताने सत्कार केला विदयार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भाषणे, गाणी, नाटक सादर केली.काही विद्यार्थी गुरु -शिष्य वेशभूषा करून आलेत. कातकाडे मॅडम यांनी प्रथमतः त्यांच्या सर्व गुरूंना वंदन केले व गुरु शिष्य परंपरा गुरु शिष्यांच्या जोड्या तसेच प्रत्येकाने जीवनात गुरु करावा असे आव्हान यानिमित्ताने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शितल आहेर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

