
नाशिक ( ्रतिनिधी ) म वि प्र आश्रम शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुभाष दळवी होते. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून श्री राजेंद्र चव्हाण होते. त्यांनी आपल्या भाषणात गुरुपौर्णिमेचे महत्त्व,गुरु शिष्य परंपरा व आधुनिक शिक्षण आणि प्राचीन शिक्षण याविषयी व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोरख दाते यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार श्री संतोष जाधव यांनी मानले.

