
नाशिक येथील न्यू मराठा हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर ,शिक्षक,विद्यार्थी…
नाशिक (प्रतिनिधी)| मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूल नाशिक मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे होते. व्यासपीठावर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.गुरुपौर्णिमेचा कार्यक्रमाची सुरवात महर्षीव्यास यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली.इयत्ता दहावी अ च्या विद्यार्थ्यांनी भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापक व सर्व सेवकांचा सत्कार करण्यात आला.या वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमा चे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले. शिक्षक मनोगतात अंजली निकम यांनी जीवनातील गुरुचे महत्त्व सांगितले.अध्यक्षीय मनोगतात विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले की व्यक्ती च्या जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे असून गुरु कडून जीवनास योग्य दिशा मिळते. महर्षी व्यास यांच्या आदर्शवादी जीवनात खऱ्या गुरुची महिमा कळते.विद्यार्थ्यांनी शिक्षकरुपी गुरुच्या माध्यमातून आपली योग्य जडणघडण करुन घ्यावी हे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा तिडके व रुतिका पाटील यांनी केले तर आभार प्रिया कोरडे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इयत्ता दहावी अ च्या वर्गशिक्षिका अंजली निकम विद्यार्थी ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन विद्यालयातील शिक्षिका रूपाली शेडगे, मोनिका वडजे यांनी केले.
