
वडांगळी…(प्रतिनिधी). येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी या विद्यालयात गुरुपौर्णिमा म्हणजेच महर्षी व्यास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार हे होते. सुरुवातीला महर्षी व्यास यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार व पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक शंकरराव सांगळे, भाऊसिंग पंढुरे ,स्मिता वाघ, सुभाषराव ठोक, रामकृष्ण सानप, निशा राजेभोसले, विजय कोकाटे, राजाराम खेताडे, रवींद्र हांडगे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ऋणातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लघुवस्त्र व गुलाब पुष्प देऊन सर्व गुरुजनांचे सत्कार आभार व्यक्त केले. यावेळी शंकरराव सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधून आयुष अडसरे, अंकित ठोक, शरण्या खुळे व संस्कृती शेलार यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार म्हणाले की महर्षी व्यास यांची जयंती गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. यानिमित्त त्यांनी सांगितले की मी माझे गुरु व माझे आई-वडील यांना प्रथमतः वंदन करतो. आपण प्रथम स्थान आईला दिले पाहिजे. नंतर गुरुला व नंतर क्षणोक्षणी आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या कनिष्ठ वरिष्ठ गुरूंना दिले पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल खुळे हीने केले. तर आभार प्रदर्शन नियती भुसे येणे केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
