
भालुर (प्रतिनिधी ) गुरुपौर्णमेनिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय भालूर येथे महर्षी व्यास पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थिनीनीं सुंदर नियोजन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. सी.महाले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सुरेश नारायणे यांचे चरण व औक्षण पूजन केले त्याचबरोबर. सर्व शिक्षक व शिक्षिका यांचेही विद्यार्थ्यांनी पूजन केले व महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

.याप्रसंगी नंदिनी पाटील यांनी मला हे दत्त गुरु दिसले हे गीत गायन करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी अश्विनी गांगुर्डे, कांचन सोळसे,संस्कृती सानप यांनी गुरुपौर्णिमेविषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.सुरेश नारायणे यांनी प्रथम महर्षी व्यासांना वंदन करून विद्यार्थ्यांना गुरूशिष्य परंपरा त्यांच्या रसाळ वाणीतून सांगीतली. व जनक- याज्ञवल्क्य , शुक्राचार्य -जनक, भगवान श्रीकृष्ण,सुदामा- सांदिपनी , प्रभू श्रीराम व लक्ष्मणाचे गुरु ,विश्र्वमित्र , अर्जुन -द्रोणाचार्य , -विवेकानंद – रामकृष्ण परमहंस, अशा गुरु शिष्य यांच्या जोड्या व परंपरा सांगितली. गुरु शिवाय मणुष्याला ज्ञान नाही ,प्रगती नाही.जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरु शिवाय मणुष्याला पर्याय नाही, .आत्म ज्ञान देण्याचे, विद्यार्थाला आकार देण्याचे काम गुरु करतात.छत्रपती शिवाजीराजे यांचे गुरु राजमाता जिजाऊ होत्या.म्हणुन शिवछत्रपती जगातील आदर्श राजा बनलेत कारण आईचे तसे संस्कार होते.म्हणून जीवनात संस्कार हे महत्त्वाचे आहे..गुरु हा विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवत असतो .असे मौलिक विचार यावेळी प्रा.सुरेश नारायणे यांनी विद्यार्थ्यांना दिले तर

अध्यक्षीय भाषणात आर.सी. महाले म्हणाले की , गुरुप्रती आदरभाव राखा.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जे गुरु भेटतात त्यांना वंदन करून त्यांचा आशिर्वाद घ्या, म्हणजे. आपल्या जीवनाचे सार्थक होईल.असे त्यांनी प्रतिपादन केले. गायकवाड डी. आर. करवर पी. ई. चोळकेसर,तासकर मॅडम शिनगारे मॅडम ,पाटोळे एस.बी.हिरे एस.के.,सदगीर एस.बी., दिवेकर, पवार, मुंदानकर मॅडम,खरोटे मॅडम ,नंदिनी पाटील मॅडम, संध्या पाटील मॅडम, पवार मॅडम, दरेकर मॅडम, पाटील सर ,साठे सर व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा आहेर व साक्षी लहीरे या विद्यार्थीनींनी केले व आभार प्रतीक्षा आहेर या विद्यार्थ्यांनीने मानले.
