
यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संस्कारक्षम अभिनव उपक्रम आई वडील प्रथम गुरू गुरुपौर्णिमेपासून दररोज आई-वडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेतल्यास विनम्रता अंगी येते मी पणा अहंकार दूर होतो धरणी मातेला देखील वंदन होते आई-वडिलांचा आशीर्वाद म्हणजे एक सुरक्षा कवच हे कवच सतत सोबत असल्यास अशी व्यक्ती सदाचारी शीलवान बनते व आपल्या जीवनात यशस्वी होते याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेत येताना दररोज आई-वडिलांना वंदन करावे याचे पालन विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे
