
अंदरसुल (प्रकाश साबरे ). राष्ट्रसंत जनार्दन स्वामी तपोभूमी असलेल्या अंदरसूल येथे सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला पहाटे 4 वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटे जनार्दन स्वामी यांचे परम शिष्य महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज भांगसी गड यांच्या उपस्थितीत व प्रेरणेने प्रथम विधी व नंतर स्वामी परमानंद गिरी यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या पादुकांची विधियुक्त पूजन केले त्या नंतर उपस्थित भाविकांनी पूजन केले स्वामी परमानंद गिरी यांची पाद्य पूजा त्यांच्या शिष्यांनी व भाविकांनी केली त्या नंतर स्वामी परमानंद गिरी महाराज यांच्या गुरुपौर्णिमेच्या परंपरेची प्रवचन द्वारे व गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा याचे महत्व विशद केले व महाप्रसाद हजारो भाविकांनी घेतला व सांगता करण्यात आली सालाबाद प्रमाणे नासिक जिल्हा संभाजीनगर जिल्हा अहिल्या नगर जिल्ह्यातून भाविक येत असतात अंदरसुल ग्रामस्थ
