
लासलगाव, दिनांक 10 जुलै (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या नक्षत्र या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नू.वि.प्र. मंडळाच्या मॅनेजिंग बोर्डाचे सदस्य डॉ.भाऊसाहेब रायते यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, नक्षत्रचे संपादक डॉ.प्रणव खोचे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.बापू शेळके, प्रा.सुनिल गायकर इत्यादी उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ नक्षत्र या वार्षिक नियतकालिकासाठी ‘वारसा भारतीय ज्ञान परंपरेचा’ या विषयावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतून विद्यार्थ्यांनी आपले लेख लिहिले आहेत.

नक्षत्र या नियतकालिकाचे मुखपृष्ठ विद्यार्थ्यांनी तयार केले असून ते अगदी आकर्षक आहे. नक्षत्र या नियतकालिकाने आत्तापर्यंत विद्यापीठ स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. डॉ.प्रणव खोचे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर डॉ.भाऊसाहेब रायते यांनी आपले मनोगत केले तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी केला. संपादक मंडळाचे प्रमुख डॉ.प्रणव खोचे, तसेच संपादक मंडळातील सदस्य प्रा.किशोर गोसावी, प्रा.दीपाली कुलकर्णी, प्रा.बापू शेळके यांनी नक्षत्र नियतकालिकासाठी विद्यार्थ्यांचे लेख संपादन करणे यासाठी मेहनत घेतली. प्रा.सुनिल गायकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.बापू शेळके यांनी आभार प्रदर्शन केले.

तसेच याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरु पौर्णिमा निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. त्यानंतर गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांनी उपस्थित राहून गुरुचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुरुचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असून सर्वांनी गुरूचा आदर नेहमी राखावा असे त्यांनी सांगितले. तसेच याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी गुरूचे महत्त्व विशद करत आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
