
अंदरसुल,(प्रतिनिधी ) दि. १० जुलै २०२५ – मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंदरसुल येथे पारंपरिक उत्साहात व अध्यात्मिक वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व व्यासपूजनाने झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुणजी भांडगे सर उपस्थित होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आर. बी. गायकवाड सर, रामनाथ ऐंडाईत, राजुळे सर, सजन सर, जूनियर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा म्हस्के उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाची विद्यार्थिनी जगझाप साक्षी हिने केले. यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले, कविता, भाषण,नाटिका सादर केल्या. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी ज्योती जोरवर, प्रिया कु-हे, गायत्री धनगे, श्रद्धा गवळी , तेजश्री गवळी, मयुरी घोडके, पायल गोनटे, गायत्री जगझाप यांनी विशेष सहभाग नोंदवला.राजुळे सर व सजन सर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या व्याख्यानातून सांगितले. तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आर.बी गायकवाड सर यांनी मानवाच्या जीवनात गुरुचे असलेले अनन्यसाधारण महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच कनिष्ठ विद्यालयाचे प्रा. सचिन सोनवणे सर यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरण प्रस्तुत करत गुरुच्या मार्गदर्शनाची मानवाला असलेली गरज स्पष्ट केली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुणजी भांडगे सर यांनी गुरुची व्याख्या “गुरु म्हणजे जीवनातील अंधार दूर करून प्रकाश दाखवणारा दीपस्तंभ” अशा शब्दात केली.याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आध्यात्मिक उन्नतीचा संकल्प केला.सदर प्रसंगी प्रा.मयूर भागवत, मयूर खैरनार,मिसाळ वरद, अमोदकर गणेश, शिरसाट शिवप्रसाद ,प्रतिभा कोटमे, प्रिती वल्टे ,प्रतीक्षा वाकचौरे,वैष्णवी माळी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
