
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) ता 10- भाऊसाहेब नगर ता निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात महर्षी व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला तासकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थीनी प्रतिनिधी पूर्वा जाधव या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होती. महर्षी व्यासांनी अनेक ग्रंथांचे लेखन करून पौराणिक साहित्य निर्मितीत मानाचे स्थान मिळवल्याचे मुख्याध्यापिका सौ तासकर यांनी सांगितले. तनया कुटके व मोक्षदा खैरनार यांनी सूत्रसंचालन केले तर सोनाली पोरजे हिने प्रास्ताविक केले.अनुष्का लोणारे, ईश्वरी वाघमारे, गायत्री जाधव, ईश्वरी उशीर, स्नेहल गांगुर्डे, वेदिका देशमुख, मयुरी थोरात, सायली जाधव, गायत्री शेळके, या विद्यार्थीनींनी गुरुंची महिमा आपल्या भाषणातुन सांगितली.शैलजा घोटकर व दिपाली ढोमसे यांनी शिक्षक मनोगतात गुरुंची आवश्यकता स्पष्ट केली.आभार स्नेहल बोरसे हिने व्यक्त केले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
