
. नाशिक (प्रतिनिधी) जीवन जगण्याची रीत,आयुष्याचे चुकलेले गणित पुन्हा मांडण्याची धडपड ,सकारात्मकपणे जगण्याची मनाची समजूत याचा वेध गझलकारांनी मैफिलीत घेतला.विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, नाशिकतर्फ गझल विश्वास मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास लीलावती जयदेव ठाकूर यांची संकल्पना असून, आयोजक विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे सचिव विनायकआशा पुरुषोत्तम रानडे व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर आहेत तर समन्वयक संजय सुभद्रा नानासाहेब गोरडे आहेत. विश्वास हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे ही मैफल संपन्न झाली गझल विश्वास चे एकोणतीसवें पुष्प होते यामध्ये निमंत्रित गझलकार अनिता बोडके यशश्री रहाळकर अतुल देशपांडे गोरख पालवे सिमा ताडगे हिरालाल बागुल विशाल टर्ले होते तर मैफिलीचे सूत्रसंचलन जयश्री वाघ यांनी केले.गोरख पालवे यांनी जीवन जगण्याचे सामर्थ्य म्हणजे काय हे गझलेतून मांडले.*अंधार भेदणारी आमची जमात आहे*.*तो सूर्य पेटलेला काळजात आहे*अतुल देशपांडे यांनी गझल निर्मितीची सळसळ आणि धग मांडली*व्हायला सुंदर गझल नस सापडावी लागते**आतमध्ये एक ठिणगी जाळ व्हावी लागते*यशश्री रहाळकर यांनी स्त्री पुरुष नात्याचा बंध आणि माणूसपण उलगडले*बाई असणे इतके सुंदर निभावले मी**त्यातच माझे मनुष्य असणे गमावले मी*सीमा ताडगे यांनी जीवनाची सुंदरता ,नावीन्य विषद केले*जिंदगीभर तू दिला वनवास आहे**वाटते जगणे किती खास आहे*विशाल टर्ले यांनी तिच्या आठवणींची व्यथा ,कथा सांगितली*छळवून रात्र गेली रात्र गेली* *तिच्या एका इशाऱ्याने खिळवून रात्र गेली*अनिता बोडके,यांनी प्रेमाची जाणीव,आणि नात्यातील अवस्था मांडली.हिरालाल बागुल,जयश्री वाघ यांनी आपल्या गझलातून जीवनाचे रंग,अस्तित्वाचे विविधरंगी रंग मांडले सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. सर्वसमावेशक गझलेची चळवळ असून त्यात जास्तीत जास्त गझलकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वास जयदेव ठाकूर, विनायक रानडे, ऋचिता ठाकूर व समन्वयक संजय गोरडे यांनी केले आहे.
