
नाशिक रोड ( प्रतिनिधी) वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण विद्यार्थिंनीसाठी १००% सवलतीचा मोफत बस पास वितरण करण्यात आले.दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॉलेज,नाशिक.या शाळेत आज शनिवार दि.२८/०६/२०२५ रोजी शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या ५२ विद्यार्थिनींना सी.बी.एस.ठक्कर आगाराचे वाहतूक नियंत्रक श्री सुधीर खोब्रागडे व श्री संदिप ढवण यांच्या हस्ते पासचे वितरण करण्यात आले.मोफत बस पास योजनेतंर्गत हे पास देण्यात आले.तसेच विद्यार्थिनींच्या समस्यांबाबत श्री सुधीर खोब्रागडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व मा.श्री मिलिंद कोठावदे सर यांच्याशी चर्चा केली.त्यांनी शिक्षक व विद्यार्थिंनीना महामंडळाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण विद्यार्थिनींनीसाठी १००% सवलत या पास योजनेची माहिती दिली.आणि मोफत बस पास मिळाल्यानंतर विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला.श्री किरणकुमार मंडळ सर व श्री किसन बागुल सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,अधिक्षिका सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिंनींनी उपस्थित होते.
