
सोनांबे (प्रतिनिधी) सोनांबे जनता विद्यालयातील इंग्रजीचे तज्ज्ञ ज्येष्ठ शिक्षक पंडितराव चीने यांचा सेवापुर्ति सत्कार सोहळा विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.विद्यालयाचे पर्यवेक्षक दिगंबर जाधव,पालक संघाचे उपाध्यक्ष नितीन पवार,सदस्य अमोल पवार,पंडितराव चीने, सौ रुख्मिणी चीने,विद्यालयाच्या राष्ट्रपती ज्योती पाटील,कुणाल चिने,सतीश चीने ,श्वेता चीने आदी मंचावर उपस्थित होते.विद्यालयाचे पर्यवेक्षक दिगंबर जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.गित मंचाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.

विद्यालयाच्या वतीने महावस्त्र,शिवप्रतीमा,शाल व श्रीफळ देवून पंडितराव चिने यांचा मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ शिक्षिका जनाबाई सूडके,सोपान पवार,योगिता शिंदे,कुमारी प्रणाली पवार,सतीश चीने ,कुणाल चीने यांनी श्री चीने यांच्या संबंधी गौरवपर भाषणे केली. पंडितराव चीने सर यांनी २९ वर्षे प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम केले.इंग्रजी विषयाचे प्रभावी अध्यापन करून हजारो विद्यार्थी घडवले अशा समर्पित शिक्षकांमुळेच शिक्षित व सुसंस्कारित पिढी घडते असे गौरवोद्गार मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी अध्यक्षपदावरून बोलतांना काढले.तालुका संचालक आदरणीय कृष्णाजी भगत साहेब यांच्या शुभेच्छा या कार्यक्रमाला लाभल्या असल्याचे ते म्हणाले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व सोनांबे जनता विद्यालय यांचा मी ऋणी असून भविष्यातही मी गरज लागेल तेव्हा संस्थेच्या मदतीसाठी तत्पर राहीन असे आश्वासन पंडितराव चिने यांनी सत्काराला उत्तर देताना दिले.याप्रसंगी त्यांनी विद्यालयासाठी रुपये ५५५५ चा धनादेश मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी केले.आभार भाऊसाहेब दहिफळे यांनी मानले. यावेळी दीपक पगारे,भारती धाक तोडे, नवनाथ माळी, किरण पवार, मीना केदार, रुपावली काळे, वर्षा मोरे, सुहास जुन्नरे,शबा नाबी कादरी,मिलिंद पाटील,रुपाली महाले ,सोनाली पाटील,रोहिणी पवार,दिपाली घोटेकर,संवे दिता जाधव,जालंदर कांडे कर,अनिकेत चतुर, सुनील पवार,निवृत्ती साबळे,भाऊसाहेब तांबे ,राजेंद्र पालवे, राम शेळके, संकेत शिंदे, वैभव शिंदे आदिंसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
