
"मनुष्य निर्माण" हा सर्व मानवी प्रयत्नातील मूलभूत प्रयत्न होय ! जेव्हा मनुष्य घडतो, तेव्हा ओघानेच समाज आणि राष्ट्र दोन्ही घडत असतात. राष्ट्राच्याच काय, पण विश्वाच्या पुनरुत्थानासाठी देखील मनुष्य निर्माण ही मूलभूत प्रक्रिया आहे. जेव्हा स्वतःविषयीचा, स्वार्थाविषयीचा कोणताही विचार आपल्या मनाला शिवत नाही तेव्हाच आपल्या हातून सर्वोत्कृष्ट कर्म घडते, तेव्हाच आपला सर्वात जास्त प्रभाव पडतो. पूर्णपणे निरपेक्ष व्हा, फलाविषयी पूर्णपणे उदासीन राहा; तेव्हाच तुम्ही यथार्थ कर्म करु शकाल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ४ आषाढ शके १९४७
★ जेष्ठ अमावस्या
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २५ जून २०२५
★ १९०० भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लुई माउंट बॅटन यांचा जन्मदिन
★ १९३१ भारतीय माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्मदिन
★ १९७५ देशांतर्गत अशांततेच्या कारणावरुन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्लाने राष्ट्रपती फखुद्दीन अली अहमद यांनी मध्यरात्री राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली.
★ आंतरराष्ट्रीय त्वचारोग (कोड) निवारण दिन.
- सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९४७ वा दिवस
