
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९४६ वा दिवस* भगवी वस्त्रे ही काही चैन करण्यासाठी परिधान करायची नाही. तुमचे शरीर, मन व वाणी जगाच्या कल्याणासाठीच असली पाहिजे. तुम्ही हे वाचले असेल मातृदेवोभव ! पितृदेवोभव ! आचार्यदेवोभव! पण मी म्हणतो ‘दरिद्रीदेवोभव! हेच तुमचे खरे देव आहेत. गोरगरीब, सामान्य, दरिद्री लोकांची सेवा हाच जगातला सर्वोच्च धर्म आहे. या दरिद्री नारायणांच्या उध्दारासाठी आपल्या कल्पनांचा, विचारांचा प्रसार करा त्यासाठी गावोगाव हिंडा. दारोदार, घरोघर जा. तरच तुमच्या हातून खरेखुरे कार्य घडून येईल. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ३ आषाढ शके १९४७*
★ जेष्ठ वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २४ जून २०२५ ★ १८६९ पुण्यातील गणेश खिंडीत चार्ल्स रँडचा वध करणारे क्रांतीकारी नेते दामोधर हरी चाफेकर यांचा जन्मदिन.
★१९२८ समाजवादी नेत्या व ६ व्या लोकसभेच्या सदस्या, खासदार मृणाल गोरे यांचा जन्मदिन.
★ पक्षाघात निवारण दिन.
