
: ओझर ( वार्ताहर) जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानली जाणारी दर चार वर्षांनी भरणारे अत्यंत मानाची अशी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा मानली जाते 3000 वर्षांचा इतिहास असलेले ही स्पर्धा जवळपास 170 देशांचे प्रतिनिधित्व करणारी जागतिक युनो संघटनेमध्ये 23 जून1894 रोजी आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा भरण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. तेव्हापासून 23 जून हा दिवस जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो. ओझरच्या माधवराव बोरस्ते विद्यालयामध्ये देखील मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या पुढाकाराने क्रीडा शिक्षक प्रभाकर लावंड उज्वला जाधव मनोरमा सोमवंशी यांच्या प्रयत्नातून ऑलिंपिक ज्योतीचे प्रतीक म्हणून मशाल संचलन करण्यात आले. प्रथम ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत यांच्या हस्ते ऑलिंपिक ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच बलाची उपासना असणारे बजरंग बली व माता सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व प्रकारच्या क्रीडा साहित्याचे पूजन देखील आजच्या दिवसाला करण्यात आले. तसेच मुला मुलींच्या रस्सीखेच स्पर्धा घेऊन विजयी संघांना मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचे हस्ते रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल हांडोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीता शेटे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्वच शिक्षक शिक्षकेतर सहकारी बंधूभगिनी यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी देखील ह्या दिवसाचा आनंद घेतला.
