
मखमलाबाद विद्यालयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ज्येष्ठ क्रीडाशिक्षक अनिल पगार यांनी या दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.त्यांनी सांगितले की,आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांची संकल्पना पियरे डी कुबर्ते यांनी मांडली.त्या स्मरणार्थ २३ जून १९४८ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला

जातो.आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना २३ जून १८९४ रोजी फ्रान्स मधील पॅरिस येथे झाली.क्रीडाप्रेमींसाठी आजचा दिवस खूप खास आहे.ऑलिम्पिक खेळाचा प्रसार आणि खिलाडूवृत्ती वाढविण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो असेही त्यांनी शेवटी सांगितले.याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड व प्राचार्य संजय डेर्ले यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा ज्योत सुपूर्त करून मैदानावर ऑलिम्पिक ज्योत घेऊन विद्यार्थ्यांनी रॅली काढली.कार्यक्रमास पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,ज्येष्ठ क्रीडाशिक्षक अनिल पगार,शरद आहेर,सुनिता उशीर, ज्युनिअर कॉलेजचे क्रीडाशिक्षक डेर्ले सर,प्रमोद पगार,रंगनाथ संगमनेरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व क्रीडाशिक्षक यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
