
वडांगळी.(प्रतिनिधी )येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी ता. सिन्नर या विद्यालयात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक,क्रीडा शिक्षक राजेंद्र गीते,विलास गोसावी ,प्रशांत पाटील,विजय कोकाटे सुभाषराव ठोक, स्मिता वाघ, शंकरराव सांगळे, मनीषा आगळे निशा राजे भोसले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. ऑलिम्पिकचे जनक बॅरन पियर कुबुर्टीन यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. क्रीडा शिक्षक बाळासाहेब आडसरे यांनी ऑलिंपिक दिनाचे महत्त्व व शिस्तीचे महत्व सुंदर व मार्मिक शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना समजून सांगितले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार म्हणाले की 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.जगभरातील खेळाडूंना सर्वोत्तम खेळाचे प्रात्यक्षिक व शारीरिक व्यायाम तसेच आपापल्या देशाचे नाव उज्वल करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त होते.असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी मुले व मुली यांच्या धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याचे नियोजन सर्व क्रीडा शिक्षकांनी केले होते. सूत्रसंचालन बाळासाहेब आडसरे यांनी केले. तर आभार रवींद्र हांडगे यांनी मानले .यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
