
. यशवंतनगर, २१ जून – येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात एकत्र येऊन विविध योगासनांचे सादरीकरण केले.कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाने झाली. त्यानंतर सहशिक्षिका शिरसाठ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावले आणि प्रात्यक्षिक करून दाखवले. मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात योग दिनाचे महत्त्व, आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे समजावून सांगितले.कार्यक्रमात कृषीदूत वाघ गौरव , तांबे आदेश, टेकवडे प्रणव , तांबोळी साहिल,वायाळ अवधूत, येवले सिद्धांत,इंगळे सुमेधकुमार यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन,वक्रासन, अनुलोम-विलोम, कपालभाती , आदी योगासने सादर केली.कार्यक्रमात कृषीदूत यांची विशेष भूमिका होती. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात समन्वय साधला, विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जनजागृती केली आणि योगासने सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाच्या सांगता क्षणी सर्व विद्यार्थ्यांनी दररोज नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे शाळेत आरोग्यदायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
