
नांदगाव (वार्ताहार )२१ जून हा दिवस “जागतिक योग दिन ” म्हणून व्ही जे हायस्कुल नांदगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा . करण्यात आला हा दिवस जागतीक योग दिन म्हणून ओळखला जातो. आपले शरीर,मन आणि आत्मा यांना एकत्रित आणून मोक्षाची किंवा मनःशांती ची अत्युच्च पातळी गाठणे म्हणजे ‘योग ‘ अशी योगाची आधुनिक व्याख्या केली जाते. योग मानवजातीसाठी मोठे वरदान आहे. आधुनिक काळात योग किती महवाचा आहे हे विद्यार्थांना शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री ठाकरे एल् एन् यांनी सांगितले तर योगाचे प्रात्यक्षिक शाळेतील कला शिक्षक श्री. चव्हाण विजय यांनी करून घेतले यात शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांनीही सहभाग घेतला प्रसंगी सन्मानिय पदाधिकारी यांचे हस्ते हनुमानाचे प्रतिमा पूजन करून सुरवात झाली

प्रसंगी व्यासपिठावर उपमुख्या.श्री. मिलिंद श्रीवास्तव ,पर्यवेक्षक श्री. डॉ.जोगेश्वर नांदूरकर बोर्ड सदस्य श्री.मधे सर , गुलाब पाटील श्रीमती झोडगेकर क्रिडा शिक्षक श्रीमती देवरे सुनिता ,खंडू चौधरी प्रविण अहिरे आदी उपस्थित होते .या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद ,कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
