
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिराच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला. नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत खाणकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक व्ही.ए.पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेत व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. दोन्ही विद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
