
आंबेगाव तालुका:(प्रतिनिधी ,दत्ता नेटके ) आंबेगाव तालुका पूर्व मंडल आयोजित संकल्प सभा श्री विकास दादा जगताप संचालक पी एम विश्वकर्मा योजना पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी यांनी केलेल्या 11 वर्षाच्या यशस्वी कामगिरीबद्दल उपस्थिततांना माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहावयास मिळाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित पुणे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर ताराचंदजी कराळे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ बाणखेले, लोणी गावचे लोकनियुक्त सरपंच सावळा भाऊ नाईक, प्रमोद जी वळसे, मोहनजी सावंत श्याम कांत शिंदे,एकनाथजी गावडे, उत्तम जी शिंदे,प्रसादजी खोल्लम , सुवर्णाताई साकोरे,माऊली क्षीरसागर उपस्थित होते. आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे पूर्व मंडल अध्यक्ष किरण भाऊ वाळुंज यांनी शासनाच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल डॉ. ताराचंद जी कराळे यांनी त्यांचे आभार मानले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.सूत्रसंचालन सागर भाऊ जाधव लोकनियुक्त मा सरपंच धामणी यांनी केले

