
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९४० वा दिवस* युवकांच्या अंगी जोश, उत्साह भरपूर असतो पण आज समाजामध्ये धर्म म्हणून जे काही शिकविले जात आहे त्याचे स्वरूप पाहता सर्व उत्साह जोश, स्फूर्ती, प्रेरणा नाहिशी करण्याची कामच केले जात आहे असे दिसते. पण त्या जागी नवीन स्फूर्तीस्रोतांची प्रतिष्ठापना मात्र केलेली दिसत नाही. धर्माचे समजले जाणारे हे स्रोत माणसाचे व्यक्तिमत्त्व संकुचित करणारे, त्यांचे हितसंबंध मर्यादित करणारे आणि त्याला स्वयंकेंद्रित करणारे आहेत. खरा धर्म जो असतो तो उत्साह, स्फूर्ती, स्वयंप्रेरणा कधीही नष्ट करीत नाही तर याउलट वाढवितो, त्याचा विस्तार करतो त्यात अधिकाधिक भर टाकत असतो.
*स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर २८ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १८ जून २०२५
★ संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, देहू
★ १८५८ झाशीची राणी लक्ष्मीबाई (मणिकर्णिका तांबे) यांना ब्रिटिशांविरुध्द कडवी झुंज देतांना ग्वाल्हेर येथे वयाच्या २९ वर्षी वीरमरण आले. (स्मृतीदिन)
★ १९११ पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहिनी यांचा जन्मदिन.
🎂गणतंत्र न्यूजचे संपादक प्रा.सुरेश नारायणे व सौ.अलका नारायणे यांचा लग्नाचा ३९ वा लग्न वाढदिवस
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
