
सिन्नर (प्रतिनिधी)१७ जून २०२५ राजमाता जिजाऊ यांच्या३५१ व्या स्मृतीदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी जनता आदिलशाही निजामशाही कुतुबशाही यांच्या कडून होणाऱ्या अन्याय अत्याचाराने जनता त्रस्त होती.होणारा त्रास दूर करण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छञपती शिवाजी महाराजांनी (मराठा) आठरापगड जाती-जमातींना एकञ करून स्वराज्याची स्थापना केली लोकांवर होणा-या जुल्मी अन्याय अत्याचारा विरोधात कसे लढावे व जातिय विषमता,अंधश्रध्दा नष्ट व्हावी,जनता गुण्यागोविंदाने एकञ नांदावी या साठी शिवाजी महाराजांना समतेची शिकवण जिजाऊंनी दिली. *डाॅ.विजय लोहारकर म्हणाले की*.मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे सर्व जाती-जमाती धर्मातील लोक.आज जाती-धर्माच्या नावाखाली समाजा-समाजात तेढ निर्माण केली जात आहे.तरूणांनी जातीभेद न करता हातात दगड, दंडुके न घेता हातात लेखणी घेऊन चांगले शिक्षण घेतले पाहिजे व राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना दिलेली शिकवण आठवणीत ठेवून अन्याय अत्याचाराचा विरूद्ध आवाज उठवला पाहिजे. असे म्हणाले*या कार्यक्रमाचे सुञसंचलन सुनिल कुऱ्हे सर तर प्रास्ताविक विजय मुठे व आभार रामु इदे यांनी मानले* या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, डाॅ विजय लोहारकर, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे संस्थापक रामुदादा इदे, सहसंस्थापक विजय मुठे सुनिल कु-हे सर,दिलीप उगले, विष्णू भालेराव, दत्तू नरहरी गूळे,सुदाम देशमुख, प्रकाश माळी,मनोज माळी, एजाज शेख,मालेक सैय्यद अदि उपस्थीत होते.
