
.▪️मनमाड (प्रतिनिधी)- येथील आय.यु.डी.पी.परीसरातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कै.श्रीकृष्ण मुरलीधर जाधव(वय-७७) यांचे अल्प आजाराने निधन झाले.ते चांदवड तालुक्यातील दुगाव केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते.भडाणे(ता.चांदवड) येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुर्यकांत जाधव यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी,मुलगी , एक मुलगा,सून व नातवंडे असा परीवार आहे.स्वाध्याय परीवाराचे ‘स्वाध्यायी’म्हणूनही त्यांची ओळख होती. आय.यु.डी.पी.व मनमाड शहरातील शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
