
पिंपळगाव (वार्ताहर )पिंपळगाव बसवंत दिनांक.१४/६/२०२५ जिल्हा परिषद शाळा शिंगवे ता.निफाड या शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती ची बैठक संपन्न झाली. श्री.किरण डेर्ले, सदस्य राजेंद्र डेर्ले, दत्तात्रय कोरडे,चेतन टर्ले,हर्षद डेर्ले,सुवर्णा ठाकरे,श्री.रमाकांत शिंदे मुख्याध्यापक सचिव यांच्या उपस्थितीत पार पडली.या प्रसंगी प्रतिष्ठीत ग्रामस्थ आदरणीय श्री रामदास सानप आपल्या पाल्यांचा पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी आले असता त्यांनी शाळेविषयी बोलकी प्रतिक्रिया मांडली.आपल्या गावातीलच शाळेला पसंती दिली. मराठी माध्यमातूनच गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाण्यासाठी होणारी आर्थिक बचत व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी गावातील शाळेत प्रवेश घेण्यासाठी इतर ही पालकांना मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक श्री रमाकांत शिंदे सरांनी व शिक्षकांनी शाळेची खास वैशिष्ट्ये समजून दिली.या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांनी अभिनंदन केले.शाळेतील तज्ञ प्रशिक्षित अनुभवी संवेदनशील शिक्षक वृंद, सेमी इंग्रजी माध्यम मातृभाषेतून शिक्षण, ज्ञानरचनावादी भविष्यवेधी शिक्षण, आनंददायी बालस्नेही शिक्षण, मोफतगणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी,मोफत आरोग्य तपासणी, शालेय पोषण आहार, सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती, या शासकीय योजना दिल्या जातात तसेच शुद्ध पिण्याचे पाणी ,सुरक्षित स्वच्छ व आनंददायी परिसर ,प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शक, आदर्श परिपाठ इत्यादी उपक्रम शाळेत राबवले जातात. इयत्ता पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न नुसार अभ्यासक्रम पूर्ण करून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. बैठक यशस्वीतेसाठी श्रीमती देसले,श्री.दिलीप बागडे, श्री.राकेश शिंदे, श्रीमती विभांडिक ,श्रीमती देवरे, श्रीमती, तिडके, श्रीमती सोनवणे तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी श्री.रावळे, श्री.संतोष खराटेयांनी परिश्रम घेतले.श्री.बागडे सरांनी उपस्थितांचे आभार मानले.
