

पुणे (बातमीदार) महाराष्ट्रातील दिवाळी अंकांच्या संपादकांची संस्था असलेल्या *दिवा प्रतिष्ठान* च्यावतीने घेण्यात आलेल्या ‘दिवा वाचक स्पर्धा-२०२४ चे’ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून नाशिक येथील सुभाषित या विनोदी दिवाळी अंकाचे सुभाष सबनीस आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश बेलेकर यांचा सन्मानन करण्यात येणार आहे.इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे क्रमांक एक (विभागून)स्नेहल संजय पोटे- बेळगाव. सायली वैद्य, मुंबई.क्रमांक दोन (विभागून)डॉ. प्रभाकर शेळके, जालना.रेखा नाबर , मुंबई क्रमांक तीन (विभागून)प्रज्ञा जांभेकर, सायन मुंबई.श्रद्धा वझे, कल्याण.सदर पुरस्कारांचे वितरण नाशिक येथे येत्या १५ जून रोजी दुपारी दोन वाजता भावबंधन मंगल कार्यालय, पंचवटी येथे नाशिक कवीचे अध्यक्ष इंजी.बाळासाहेब मगर, ज्येष्ठ साहित्यिक नरेश महाजन आणि कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष-चंद्रकांतदादा शेवाळे, उपाध्यक्ष-भारतभूषण पाटकर, कार्याध्यक्ष-सुनिल उंब्रजकर, आणि कार्यवाह विवेक मेहेत्रे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
