
अक्कलकोट (प्रतिनिधी) – ग्रामीण जीवनाचे विविध पैलू, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक जडणघडण उलगडणारा लोकप्रिय दिवाळी अंक “गावगाथा” यंदा आपल्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने गावगाथा – 2025 या विशेष दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा अंक दर्जेदार, वाचनीय आणि आकर्षक स्वरूपात प्रकाशित करण्यात येणार असून ग्रामीण जीवनाला स्पर्श करणारे लेख, ललित लेखन, कविता, अनुभव, प्रवासवर्णने, ग्रामीण शौर्यकथा, सामाजिक प्रश्नांवरील चिंतनपर लेख, मुलाखती, व्यक्तिचित्रणे, कथा, लघुकथा, वेशभूषा-व्यवहार, लोककला, ग्रामीण भाषाशैली अशा विविध साहित्य प्रकारांना अंकात प्राधान्य दिले जाणार आहे. हा दिवाळी अंक नवोदित व मान्यवर लेखकांसाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. ग्रामीण मातीतून आलेल्या साहित्यिकांचे विचार, शब्द आणि भावभावना गावगाथाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत.संगणकावर टाईप केलेले साहित्य (मराठी युनिकोड फॉन्टमध्ये) ई-मेलने पाठवावे.साहित्याबरोबर लेखकाचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि छायाचित्र पाठवावे.साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 संपर्क: धोंडपा नंदे – संपादक, गावगाथा दिवाळी अंक मो. 9850619724ई-मेल: gavgatha@gmail.comसाहित्यप्रेमी, ग्रामीण भागातील लेखक, अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी यांनी या संधीचा लाभ घ्यावा व गावगाथा – 2025 अंकात आपल्या लेखणीद्वारे योगदान द्यावे, असे आवाहन संपादक धोंडपा नंदे यांनी केले आहे.
