
मुंबई (प्रतिनिधी ) विधानभवन मुंबई येथे आज महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीची प्रारंभिक बैठक मराठी भाषा समितीचे अध्यक्ष, आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी मराठी भाषा समितीचे सदस्य आमदार मा.श्री. मनोजजी घोरपडे, मा.श्री. सत्यजितजी देशमुख, मा.श्री. चंद्रदीपजी नरके, मा.श्री. संजयजी केनेकर, मा.श्री. जगन्नाथजी अभ्यंकर, मा.श्री. बाबासाहेबजी देशमुख, मराठी भाषा विभागाचे सचिव मा.डॉ. किरणजी कुलकर्णी, सह सचिव मा.डॉ. ना.का. भोसले, सहसचिव मा.श्री. सुभाषजी नलावडे, भाषा संचालनालयाच्या संचालिका मा.श्रीमती विजयाताई डोनीकर, विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव मा.डॉ. शामकांतजी देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मा.डॉ. मिनाक्षीताई पाटील, कक्ष अधिकारी मा.श्री. जीवनजी गावकर, आदी उपस्थित होते.
