
पुणे : (बबनराव वि.आराख) दिनांक – २४/५ / २०२५ शनिवार रोजी पुणे येथे गांजवे चौक पुणे एस एम जोशी हॉल मध्ये समाज सुधारक,कवी, लेखक, विजय वडनेराव पुणे यांच्या आयोजना खाली आंतरराष्ट्रीय काव्य संमेलन पार पडले . यात राज्यातून तसेच बाहेरून राज्यातून बेळगांव कर्नाटक, तसेच गोवा येथूनही अनेक कवी फुलप्रेमी सहभागी झाले होते . क्रांती सुर्य महात्मा फुले, आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आदय शिक्षणाची गंगोत्री सावित्रीमाई फुले यांना मालार्पण करून काव्य संमेलन सुरु झाले. आयोजक विजय वडवेराव यांनी संमेलन आणि कार्याची भूमिका मांडली.याच संविधान काव्य जागर अभियानात या काव्य संमेलानाचे अध्यक्ष, कवी शाहीर मनोहर पवार केळवद बुलढाणा )यांनी – घडवा देश / जाती भेद टाळू / नियम ते पाळू घटनेचे ।। तसेच भारतीय घटना /पाठवा घरोघरी / न्यायाची शिदोरी / सांभाळवी॥ असे विषद केले . काव्यातून आपले संविधान वाचविण्याचे आवाहन केले . तसेच संविधान हा देशाचा आत्मा असून न्याय समता, बंधुता, जोपासण्याचे कार्य करीत असून प्रत्येक नागरिक यांनी आत्मसन्मान जपला पाहीजे आणि डॉ. बाबा साहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्री फुले, शाहू महाराज यांच्या आदर्श घेवून वाटचाल केली पाहिजे हे आपल्या काव्यव्दारे सांगीतले . यावेळी भिडेवाडाकार मा . विजय वडवेराव पुणे तसेच विविध जिल्हयातून कवी मान्यवर उपस्थित होते. कवी संजय हिवाळे, केळवद बुलढाणा, तसेच डॉ मंजूराजे जाधव, अशोक मोहीते, अनिल नाटेकर येळगांवकर (बुलढाणा ) यांनीही उत्कृष्ठ वैविध्य पूर्ण संविधान जागराच्या कविता सादर केल्या. मध्यान भोजनानंतरयावेळी सर्वांनी संविधान उद्देशिका वाचन केले . तसेच भारतीय सैनिक शहिद झाले त्यांना व जम्मू कश्मीर मधील मृताना सुद्धा सामुहिक श्रध्दाजली अर्पण करण्यात आली. उत्कृष्ठ नियोजन आयोजन असलेले हे आंतरराष्ट्रीय काव्य संमेलन खऱ्या अर्थाने संविधान जागर झालेआहे. चहापाणी सुग्रास भोजन व्यवस्था यात हे संमेलन यशस्वी ठरले.
