
नाशिक.(प्रतिनिधी ) नाशिक ता.कोरोना काळात थांबलेल्या जगाची वास्तवता येणाऱ्या पिढीला कळावी, हे निर्मितीचे मूळ पुस्तक निर्मितीमागचे आहे, असे प्रतिपादन किरण मेतकर यांनी केले.गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे पुस्तकावर बोलु काही या अभिनव उपक्रमात जेव्हा जग थांबल होत या पुस्तकावर किरण मेतकर बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कापुस शिल्पकार अनंत खैरनार होते. मेतकर पुढे म्हणाले की,जगात कोरोना महामारीने जग पुर्ण थांबल होतं त्यावेळी कोरोना कुठून आला .किती लोकांचा मुत्यू पावले,किती कोरोना मुक्त झाले. एका विषाणू विरोधी लढा देण्यासाठी जग सरसावले होते.या काळात घरात अडकलेल्या व्यक्तींना मदत देण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या कोरोटांईन ची व्यवस्था करून माणुसकी जपली जात होती. टाळ्या वाजवणे, थाळी वाजवणे ,दिवे लावणे अशा विविध योजना काढून लोकांना गुंतवुन ठेवण्याचा आटापिटा केला. मरण स्वस्त झाले होते.त्यावेळी एका बाजुला माणुस माणसापासून बाजुला गेला तर काही माणसं आपल्या माणसासाठी पोरका झाला होता.गंडेदोरे विकणारे ही कोरोना काळात गायब झाले. व्यसन ही गायब झाले. वर्क फाँर होम हि नवीन व्यवस्था निर्माण झाली.अशा विविध कोरोना काळातील वास्तवता आणि गंमती जमंती या पुस्तकात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.यावेळी गोकुळ आहिरे व प्रा.अर्जुन पगारे या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देउन सन्मानित करण्यात आले.सुरेश पवार यांनी सुत्रसंचालन केले तर आभार राजेंद्र उगले यांनी मानले.दरम्यान येत्या ३० मे रोजी सिमाराणी बागुल जिवनाची शाळा या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
