
.वडांगळी..(प्रतिनिधी).. येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात आज इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गुणपत्रक (१२ वी ) व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे हे होते. यावेळी अभिनव बालविकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके, आर. जे. थोरात सर, वडांगळीचे सरपंच नानासाहेब खुळे सर , युवा सभासद विक्रम माधवराव खुळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष खंडेराव खुळे, गोरक्षनाथ सांगळे, मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक , ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख विलास तांबे, विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

*इ.१२ वी विज्ञान प्रथम ५ क्रमांक*१) सांगळे हर्षदा गोरक्षनाथ (७३.५०%)२) सांगळे जयेश गोकुळ (७१.८३%)३) भोर तेजस्विनी शिवाजी (७०.१७%)४) चव्हाणके धनंजय मुकुंद (७०.००%)५) ठोक राजश्री बाबासाहेब (६९.१७%) *इ.१२ वी कला प्रथम ५ क्रमांक*१) सोनवणे अश्विनी आनंदा ( ८०.५०%)२) गिते आरती सोमनाथ (७७.१७%)३) गिते साक्षी सोपान (७५.३३%)४) गिते अनुष्का शरद (७२.५०%)५) जोरी सृष्टी गंगाधर (७२.१७%)* *इ.१० वी प्रथम ५ क्रमांक* १)खुळे तेजश्री दत्तात्रय (९२.००%)२) खुळे प्रणाली बाळासाहेब (९१.६०%)३) भवर समीक्षा संजय (९१.२०%)४) घुले हर्षदा तानाजी (९१.००%)५) चव्हाणके संचिता रामहरी (९०.२०%) या गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी विद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख सर्वांसमोर मांडला . गुणवत्तेसाठी आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही . त्याचप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते अतिशय दृढ असते . अशा प्रकारचे प्रास्ताविक त्यांनी केले. सरपंच नानासाहेब खुळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी पासून अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत व त्यांची चांगली तयारी करण्यासाठी विविध माध्यमांचा अवलंब करावा असे आवाहन केले . ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून भविष्यात देखील यश संपादन करावे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ग्रामपंचायत तर्फे केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. उच्च माध्यमिक विभागाच्या पालक संघाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ सांगळे यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे देखील अभिनंदन केले . शेतकरी कुंटूबातील सर्व विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींवर मात करून चांगल्या प्रकारचे यश संपादन केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले . अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुदेश दादा खुळे म्हणाले की, इयत्ता दहावी व बारावीचा निकाल उत्तम लागला आहे. त्याबद्दल त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाचा निकाल गुणवत्ता पूर्ण निकाल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले . तसेच कला शाखेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत याबाबत उदाहरण देतांना प्रांत अधिकारी रामदास खेडकर साहेब आणि शशिकांत मंगरुळे साहेब हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊनच अधिकारी झाले आहेत याची जाणीव त्यांनी करून दिली. इयत्ता बारावी विज्ञान शाखेत जास्त गुणांची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सर्वांना पुढील शिक्षणासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव सांगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संदीपराव म्हस्के यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
