
दैनंदिन जिवनात आपण जेवणात तसेच दिवसभरच्या खाण्यात-पिण्यात कशाचे सेवन करतो याचबरोबर आपण कोणते शारीरिक श्रम करतो यावर आपली पचनक्रिया आधारित असते. तुम्हाला मूळव्याध व भगंदर यासारखे आजार होउ नये, त्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी,ते आपण सदर लेखात बघणार आहोत! सगळ्या महत्त्वाचं म्हणजे सकाळी उशीरा पर्यंत झोपणे टाळावे तत्यामुळे तुमची पचनशक्ती बिघडते , सकाळी नाश्ता मधे बटाटे, बेसन, तेलाचे पदार्थ , शिळे अन्न , मैदा , साखर , साबुदाणा अशा प्रकाचे पचायला जड पदार्थ खाऊ नये. खूप वेळ पर्यंत बसून राहण्याचे शारीरिक श्रम असणारा जर तुमचा व्यवसाय असेल तर मूळव्याध आणि भगंदर होण्याचे शक्यता अशा लोकांना मध्ये जास्त असते. तसेच अनुवंशिक हा आजार असल्यामुळे जर आपल्या परिवारात कोणाला हा आजार असला तर पुढल्या पिढी मध्ये येण्याची शक्यता जास्त असते . अशा वेळेस आपण या पासून कसे दूर राहावे आणि आजार झाल्यास त्याची गंभीरता वाढू नये याची काळजी घ्यावी . त्या साठी आपण आयुर्वेदिक पद्धतींना स्वीकारून स्वतःचा बचाव करू शकतो . रोजच्या जेवणात सलाद , हिरवे भाजीपाला , काकडी , गाजर , गोभी अशा गोष्टींचा समावेश करावा , सोबतच ताक , दूध केळी रोज खाल्ले तर ऊत्तम राहील. सतत एकच जागी बसून काम असेल तर दर २ तास नि ब्रेक घ्यावा ,रात्री जागरण , स्ट्रेस , मानसिक तणाव , या सगळ्या गोष्टी ही हा आजार होण्याला कारणीभूत आहेत . एखाद्या आजाराचे खूप वेळ पर्यंत औषधी चालू असणे हे भगंदर आणि मूळव्याध होण्याचे दुसरे कारण राहू शकते . गर्भवती असताना प्रसूती दरम्यान जास्त तणाव पडल्याने मूळव्याध , फिशर होऊ शकतो . मानसिक तणावा मुळे भूक न लागणे , वेळेवर न खाणे यांमुळे तुमची पचनक्रिया भंग होते आणि तुम्ही या आजाराला बळी पडता . म्हणून तुमची दैनंदिनी ही खूप महत्वाची आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार गंभीर होऊ शकतो ज्या मधे फक्त शस्त्रक्रिया करणे हाच एक उपाय आहे . जास्त रक्तस्त्राव झाल्याने इतर आजार ही होऊ शकते . म्हणून आपण जर या छोट्या गोष्टीची काळजी घेत असेल तर तुम्ही शस्त्रक्रिया पासून आणि आजारापासून स्वतःची सुरक्षा करू शकता . डॉ. तेजश्री वामनराव बनसोड (एम. एस. शल्यतंत्र )फोन – 74985 13252
