
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०१ वा दिवस कार्याचा आरंभ लहान स्वरूपाचा आहे म्हणून भिऊ नका. अशा लहान कार्यातूनच पुढे मोठी कार्य उत्पन्न होत असतात. महान त्यागानेच महान कार्य होऊ शकतात. धैर्य असू द्या, धीर सोडू नका. निःस्वार्थपणे, निष्कपटतेने कार्य करा. आपल्या बांधवांना नेता होण्याची धडपड करू नका, त्यांचे सेवक बना. नेतेगिरीच्या पाशवी प्रवृत्तीने जीवनरुपी महासागरात अनेक मोठमोठी जहाजे बुडवून टाकली आहेत. या बाबतीत अत्यंत सावध राहा. मृत्यूला देखील तुच्छ लेखून शेवटपर्यंत संपूर्ण निःस्वार्थपणे कार्य करा. स्वामी विवेकानंद… *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर १९ वैशाख शके १९४७
★ वैशाख शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ९ मे २०२५
★ १५४० मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्मदिन
★ १८१४ इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार दाबोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्मदिन
★ १८६६ स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्मदिन
★ १९५९ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन.
