
नांदगाव,दि.8 (मुक्ताराम बागुल):- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या घाणेगाव येथील प्रतिभा प्रवीण पठारे महिलेला कोणतेही कारण नसताना आनंद अशोक बनसोडे यांनी दारू पिऊन अश्विन शिवीगा करून जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस काकडे तपास करत आहे. याबाबत घाणेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिभा प्रवीण पठारे या महिलेला आनंद अशोक पठारे हा नेहमी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करून जीव मानण्याची धमकी देत असतो. एवढेच नव्हे तर प्रतिभा पठारे यांचा लहान मुलगा याला देखील काही दिवसापूर्वी मारहाण केली होती. याबाबत यापूर्वी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घाणेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आनंद अशोक पठारे यांने दिनांक 4 में 205 रोजी सायंकाळी साडेसात सुमारास प्रतिभा प्रवीण पठारे यांना अश्लील शिवीगाळ करून हाता चापटाने मारहाण केली. व जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून वाळुंज एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 नुसार एन.सी. 2025 कलम 115(2),352, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याबाबत पुढील प्रतिबंधक कारवाई कामी पोलिस हवालदार 1798 काकडे यांच्याकडे देण्यात आली आहे. परंतु सदर आरोपीवर अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आल्याचे दिसून येत नाही. सदर आरोपी कायम प्रतिभा प्रमुख पठारे व त्यांच्या कुटुंबीयांना विनाकारण त्रास देत असून या त्रासापासून पठारे तुम्हाला होणारा धोका टाळावा व आनंदा अशोक बनसोडे यांच्यावर कायदेशीर त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आनंद अशोक बनसोडे यांच्या विरोधात कारण करण्या संदर्भात उपोषणास बसेल व होणाऱ्या परिणाम पोलीस प्रशासन राहील असा इशारा प्रतिभा पठारे कुटुंबीयांने दिला आहे.
