
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०० वा दिवस कार्य छोटे असो किंवा मोठे असो त्यात सातत्य, नियमीतता, प्रामाणिकपणा असेल तर ते अधिक परिणामकारक होते. कोणतेही कार्य करीत असतांना आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे, ती क्षणिक असता कामा नये. आदर्शाविषयीची ही निष्ठा सतत टिकणारी, सतत प्रयत्नशील व अचंचल असायला हवी. विजांचा कडकडाट व मेघांचा गडगडाट चालू असता आकाशाकडे डोळे लावून बसणाऱ्या आणि मेघांतून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणाऱ्या चातकाप्रमाणे ही निष्ठा असली पाहिजे. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १८ वैशाख शके १९४७
★ वैशाख शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ८ मे २०२५
★ मोहिनी एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ संतश्रेष्ठ सखाराम महाराज रथोत्सव अमळनेर
★ १८२८ रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचा जन्मदिन
★ १९१६ भारतीय तत्वज्ञ स्वामी चिन्मयानंद यांचा जन्मदिन
★ जागतिक रेडक्रॉस दिन.
★ खान्देशातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सव प्रारंभ.✍️ विवेकानंदांचे जाज्वल्य, प्रेरणादायी व अनुकरणीय असे मनुष्य निर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे विचार नियमित व अखंडितपणे गत *आठ वर्षांपासून (३१ मे २०१७)* पासून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०० वा दिवस असून, हे वैचारिक अग्नीहोत्र असेच सतत तेवत रहावे यासाठी ठाकूरांच्या, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना व आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादाची अपेक्षा..
.*प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे 9921976422*
