
परधाडी ( प्रतिनिधी) आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून परधाडी येथे महावितरण चे उपकेंद्र (सबस्टेशन) (३३/११kv ०५mv) बांधकामाचे भूमिपूजन मा. श्री. अनिलदादा आहेर (माजी आमदार) यांच्या शुभहस्ते व आमदार सुहास आण्णा कांदे सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे.

या प्रसंगी परधाडी, पिंपरखेड चांदोरा रणखेडा जळगाव खुर्द नस्तनपुर चिंचविहीर हिंगणे देहरे पिंपरी हवेली व पंचक्रोशीतील गावातील नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.


