
श्री हिंगलाज माता मंदिर – क्षत्रिय भावसार समाज, नांदगाव (जि. नाशिक)नांदगाव येथील समस्त क्षत्रिय भावसार समाजाच्या श्रद्धास्थानी असलेले श्री हिंगलाज माता मंदिर हे मंदिर पारंपरिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे. कालांतराने हे मंदिर मोडकळीस आले होते, त्यामुळे मंदिराचा पुनर्जिर्णोद्धार करण्याचा निर्णय समाजाने एकमताने घेतला.या पवित्र कार्यात नांदगावचे लोकप्रिय आमदार मा. सुहास अण्णा कांदे यांनी संपूर्ण सहकार्य करत समाजासाठी आपले योगदान दिले. त्यांच्या पाठबळामुळे हे कार्य शक्य झाले.मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर दि. २९ एप्रिल २०२५ रोजी हिंगलाज मातेची महापूजा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली. या वेळी सुनील भावसार व रूपाली भावसार यांच्याहस्ते विधीवत पूजा संपन्न झाली. पूजेस समाजातील सर्व महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले व समाजबंधुंमध्ये एकोपा प्रकट केला.

हा पुनर्जन्म फक्त मंदिराचा नसून आपल्या संस्कृतीचा, आपल्यातील ऐक्याचा आणि श्रद्धेचा देखील आहे.समस्त क्षत्रिय भावसार समाज, नांदगाव तालुका यांनी दाखवलेली एकजूट आणि समर्पण हे खर्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
