

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८९२ वा दिवस राजकीय महासत्ता, साम्राज्यवाद, आधुनिक भौतिकवाद, सैनिकीशक्ती, सत्ता, संपत्ती भारतीय समाजाची पूर्वी कधीही ध्येय अथवा आदर्श नव्हते आणि यापुढेही ते कधीही असणार नाही. भारतीयांचा इतिहास त्याग, निष्ठा, कर्तव्यपारायणता, निःस्वार्थी वृती या तत्वावर ओतप्रोत भरलेला आहे. भारतीय वंशातील लोक श्रीमंतीच्या पाठीमागे कधीच नव्हते. जरी त्यांनी भरपूर श्रीमंती मिळवली तरीही दुसऱ्यावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या सीमा कधीच ओलांडल्या नाहीत. त्यांनी परकीयांवर स्वतःहून कधीच आक्रमण केले नाही. आपल्या चतुःसीमांच्या आत ते अगदी सुखी समाधानी होते. मात्र भारतीयांनी स्वतःचे, राज्याचे, मातृभूमीचे प्राणपणाने सदैव रक्षण केले आहे.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर १० वैशाख शके १९४७*
★ वैशाख शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ३० एप्रिल २०२५
★ अक्षय तृतीया
★ श्री बसवेश्वर जयंती
★ १८७० भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक, लेखक, छायाचित्रकार, संकलक, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्मदिन
★ १९०९ स्वातंत्र्यसैनिक, ‘ग्रामगीता’ ग्रंथकार, राष्ट्रभक्तीपर कवणे रचणारे, विश्वहिंदू परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष, राष्ट्रसंत माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन
★ १९४५ जर्मनीचा हुकूमशाहा व महत्वाकांक्षी सेनानी अॅडॉल्फ हिटलर व त्याची सहचारिणी इव्हा ब्रॉन यांनी आत्महत्या केली.
★ बाल कामगार विरोधी दिन.
★ ‘आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं, कैरी तुटनी खडक फुटना झुय-झुय पाणी व्हायवं’. बठ्ठासले आखाजी सणन्या शुभेच्छा.


